मराठा सेवा संघ च्याबैठकीत विविध विषयावर चर्चा

अमळनेर : येथील मराठा सेवा संघ च्या वतीने नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब अमळनेर येथील रथयात्रा नियोजन बाबत चर्चा होऊन जिजाऊ ब्रिगेडची नुतन कार्यकारिणी निवड करण्यात आली. यात जिजाऊ ब्रिगेडची नुतन कार्यकारिणी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष पदी शिवमती वैशाली शेवाळे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. अन्य कार्यकारिणीत कार्याध्यक्ष : रेखा पाटील, सचिव : नुतन पाटील, उपाध्यक्षा : सिमा पाटील, उपाध्यक्षा : सुरेखा खैरनार, कोषाध्यक्षा : पुनम ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली.
याशिवाय मराठा सेवा संघ तालुका कार्यकारिणी व शहर कार्यकारिणीचा विस्तार करणे, क्रांती पर्व स्मारक समिती गठीत करणे बाबत चर्चा झाली. बैठकीत प्रा.अशोक पवार यांचा लोकमत शिलेदार सन्मान मिळाल्या बद्दल सत्कार करण्यात आला. जिजाऊ ब्रिगेडच्या नुतन कार्यकारणीचा मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील व मान्यवरांनी सत्कार करीत शुभेच्छा दिल्या . राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांच्या रथयात्रेचे यशस्वी नियोजन मराठा सेवा संघ अमळनेर करेल अशी सर्वानुमते जबाबदारी घेण्यात आली.
सदर बैठकीत मराठा सेवा संघाचे प्रा. डॉ. लिलाधर पाटील, प्रा. डॉ. विलास पाटील, वसुंधराताई लांडगे, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, कार्याध्यक्ष महेश पाटील, उपाध्यक्ष निंबाजी पाटील, सचिव बापुराव ठाकरे, कोषाध्यक्ष दयाराम पाटील, तालुकाध्यक्ष अशोक पाटील, शहराध्यक्ष डॉ. कुणाल पवार, प्रेमराज पवार, डॉ. शरद शेवाळे, किरण पाटील, सरपंच महेश पाटील, पी. व्ही. पाटील, दिपक पाटील, प्रा. वंदना पाटील, रेखा पाटील, नुतन पाटील, सुरेखा खैरनार, सिमा पाटील, पुनम ठाकरे आणि समाज बांधव उपस्थित होते.