डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पदी ईश्वर महाजन

 

अमळनेर : मीडिया क्षेत्रात एक नवा अध्याय सुरु झाला आहे. गेल्या पाच वर्षांपासून डिजिटल मीडिया क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत मराठी लाईव्ह न्युजचे मुख्य संपादक ईश्वर रामदास महाजन यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याच्या उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे झालेल्या सहविचार सभेत या निवडीची घोषणा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केली. महाजन ची निवड ही केवळ एक वैयक्तिक यशोगाथा नाही, तर डिजिटल मीडिया क्षेत्रामध्ये सामाजिक मूल्ये आणि जबाबदारी ठेवून काम करणाऱ्या सर्व घटकांचा संदर्भ घेणारी महत्त्वाची पायरी आहे. या वर्षीच्या डिजीटल मीडियाच्या तिसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथे सहा एप्रिल रोजी करण्यात आले आहे. या अधिवेशनातून संघटनने डिजिटल मीडिया विकासाची दिशा स्पष्ट करणे आणि सामाजात जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने कार्य करण्याची योजना आखली आहे.

श्री ईश्वर महाजन यांच्या निवडीबद्दल व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस ,जेष्ठ पत्रकार डॉ. डिगंबर महाले, साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, जिल्हा संघटक जयेश कुमार काटे, ज्येष्ठ पत्रकार धनंजय सोनार, उमेश धनराळे, तालुकाध्यक्ष उमेश काटे, शहराध्यक्ष जयवंत वानखेडे, साप्ताहिक विंगचे तालुकाध्यक्ष अजय भामरे, व्हाईस ऑफ मीडिया व साप्ताहिक विंगचे तालुका व शहर, जिल्हा पदाधिकारी, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!