कायबी करा, पण आपली मायबोली अहिराणी भाषाले वाचाडा : डॉ. डिगंबर महाले

अमयनेर : परत्येक भाषासनी काही तरी खास बात ऱ्हास. खान्देशमा सुख राहो का दुख राहो, परत्येक येयले ‘माय’ हाऊ शबद वापरमा येस म्हणून अहिराणीले मायबोली म्हणतस. मातर अहिराणी भाषाइषयी गैरसमज व्हयेलमुये आमले बोलताना कमीपणा वाटाले लागस. कायबी करा, पण आपली मायबोली अहिराणी भाषाले वाचाडा, अशी आशा संमेलनना उद्घाटक ज्येष्ठ पत्रकार अन् मंगळग्रह सेवा संस्थाना अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यासनी छत्रपती शिवाजी राजासन नाव लेत अमळनेरमा सुरू व्हयेल पाचवं अहिराणी साहित्य संमेलनना उद्धाटन ना टाईमले करी. अहिराणी भाषाना जागर व्हवाले पाह्यजे या उद्देशथून आयोजित करेल पाचवं अहिराणी साहित्य संमेलननं उद्धाटन ३० मार्च ले अहिराणी सेवक साथी गुलाबराव पाटील साहित्य नगरी, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामा झाय. तव्हय त्या बोली ऱ्हायनतूत. खानदेशनं दैवत कानबाईनी पूजा करीसनी उद्घाटन झाय. स्वर्गीय गुलाब बापूसनी कोपरीनी पुर्नआठवण म्हणीसन आंगमा कोपरी, धोती असा पेहराव करीसन व्यासपीठवर एक एगळीच एंट्री करी. ‘साला मैं तो साब बन गया…’ म्हणत गुलाब बापूसन्या आठवणी जाग्या कयात. तव्हय कार्यक्रमना अध्यक्ष अहिराणी भाषाना अभ्यासक व सुप्रसिद्ध लेखक डॉ. रमेश सूर्यवंशी, आमदार अनिल पाटील, महाराष्ट्र राज्य विश्वकोष निर्मिती मंडयना सचिव डॉ. शामकांत देवरे, धनदाई माता एज्यूकेशन सोसायटीना अध्यक्ष डी. डी. पाटील या मान्यवर व्यासपीठवर उपस्थित व्हतात.
सर्वासमा पहिले बळीराजा स्मारकवर बळीराजा पूजन करीसनी पईपाहुणासनी अहिराणी ग्रंथ ठेयेल पालखीनी पूजा करीसन ग्रंथ दिंडीले सुरुवात करी. हाई शोभायात्रामा खानदेशी पेहेराव करीसन कार्यकर्ता, नऊवारी साडी घालेल, फेटा बांधेल बाया व तरुणी यासन इशेष आकर्षण होतं. मिरवणुकमा अहिराणी संस्कृतीना देखावासमा देव देवक सुपडामा लीसनी सोबत गौराई लीसनी बाया चालत होत्या. तगतराव, बाया व तरुणी यासन लेझीम पथक ढोल ताशाना गजरमा नाचत आनंद लीना. रंगीबेरंगी साड्या आणि डोयासवर रंगीत चष्मा लाईसन आदिवासी गानावर ठेका धरणारं आदिवासी नृत्य लक्षवेधी होतं. तसंच बहिणाबाई ओवी गाणारा जिवंत देखावा, मिरवणुक माथील जिजाऊ, शिवबा, सावित्री या कलाकार वेगया संदेश देत बळीराजा स्मारक – विश्रामगृह – कोर्ट – प्रबुद्ध कॉलनी, स्टेशन रोड मार्गे हाई मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामा अहिराणी सेवक साथी गुलाबराव पाटील साहित्य नगरीमा आणानंतर ग्रंथदिंडी ना समारोप व्हयना. त्याना नंतर उद्घाटन ना कार्यक्रम व्हयना. उद्घाटन सत्रानं आभार प्रदर्शन मुख्य समन्वयक रणजित शिंदे यासनी करं.

उद्घाटन ना भाषणमा डॉ. महाले आणखी बोलनात की, जनमले येताना तोंडमाहीन येणारा शबद अहिराणी ऱ्हायेत. पण आते जनमले येताना तोंड माहीन येणारा अहिराणी शबद आते इंग्रजी बनत चालनात. इंग्रजी शाया वाढी ऱ्हायन्यात. अहिराणी आपली मायबोली शे, तिन्या गाया (शिव्या), गानासमा एक गोडवा शे. आमना आमदार खासदार भी संसद भवनमां अहिराणीमा बोलतस. गुलाब बापूसनी पहिले अहिराणीमा शपथ लिधी व्हती तव्हय इरोध करा व्हता. ती आठवण म्हणीसन संमेलन स्थयले अहिराणी सेवक साथी गुलाबराव पाटील साहित्य नगरी असं नाव देयेल शे. बापूसनी अहिराणी भाषाना जागर व्हवाले पाह्यजे, अहिराणी भाषाले राजपात्रित दर्जा मिळावासाठी भलता मोठा लढा दिधा व्हता, दुर्दैवाथून अजून पण तसं व्हऊ शकनं नही. अहिराणीले राजपत्रित भाषाना दर्जा भेटाले पाहिजे असा ठराव हाई संमेलनमा मंजूर करासाठे लेवाले पाहिजे.
यावेळले प्रमुख पईपाहुणा म्हणीसन छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका न्या सहाय्यक आयुक्त अर्चना राजपूत, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी जि. प. सदस्या जयश्री पाटील, सभापती अशोक पाटील, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, निवृत्त तहसीलदार सुदाम महाजन, लेखक व कवी प्रभाकर शेयके, डी. डी. पाटील, प्रशांत मोरे, प्रा. अशोक पवार, रामेश्वर भदाणे, वाल्मिक मराठे, निलेश पाटील या मान्यवर हजर व्हतात.
अहिराणी भाषाले अभिजात दर्जा मिळावासाठे सर्वास कडथून परयेत्न व्हवाले पाह्यजेत, अशी आशा तव्हंय अमयनेर ना आमदार अनिल पाटील, अर्चना राजपूत, महाराष्ट्र राज्य विश्वकोष निर्मिती मंडयना सचिव डॉ. शामकांत देवरे, इंदूबाई भदाणे प्रतिष्ठानना अध्यक्ष बाळासाहेब भदाणे यासनी आपला मनोगत मधून व्यक्त करी. आमदार अनिल पाटील यासनी यावेळी सर्व भाषांची राणी म्हणजे अहिराणी भाषा होय, असे गौरवोद्गार काढले. अहिराणी भाषेला विधिमंडळात अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा या साठी प्रयत्न करेल असे अभिवचन दिले..
- विशेष पुरस्कार…
- अहिराणी भाषाले समर्पित असणारा, अहिराणी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील आणि मेळघाटना लेखक व अभ्यासक संजय ईश्वरदास गायन यासले अहिराणी साहित्य भूषण पुरस्कार तर धुयान्या सुमनताई देसले यासले जीवन गौरव पुरस्कार दिसनी गौरव करा. तसंच लेखक व समीक्षक प्रा. डॉ. फुला बागुल, बोधचिन्हकार किरण बागुल आणि लेखक व कवी प्रभाकर शेळके यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
- सोशल मीडियासारख्या विविध माध्यम माथून अहिराणी भाषाना प्रचार व प्रसार करणारा कलाकार निकिता पाटील, इंदिरा नेतकर, दीपक पवार, दीपक खंडाळे, गोल्डन पाटील, संतोष पाटील, विजय पवार, गरबड अहिरे, विश्राम बिरारी, अशोक पाटील, रविंद्र भोई, विलासकुमार शिरसाठ, कैलास चव्हाण, डॉ. दत्तात्रय ठाकरे, ईश्वर माळी, जयराम मोरे, समाधान बेलदार आणि संदीप भोई यासले पण अहिराणी साहित्य पुरस्कार दिसन सन्मान करा.
कार्यक्रममां प्रभाकर शेयके लिखित अहिराणी काव्य संग्रह तिन्ही दुनिया, डॉ. वाल्मिक अहिरे लिखित खान्देशातील आह्यना, ज्ञानेश्वर भामरे लिखित वाघडीना शानाभो, भगवान पाटील लिखित नाटक नियोग आणि बापूराव ठाकरे लिखित राजर्षी शाहू महाराज या पुस्तकेसनं प्रकाशन व्हयनं. प्रसिद्ध अहिराणी रीलस्टार निकिता पाटील यासनी सादरीकरण करीसन प्रेक्षकसनं मनोरंजन करं. प्रास्तविक प्रा. भगवान पाटील यासनी करं. भूमिका प्रा. डॉ. लिलाधर पाटील यासनी मांडी. वसुंधरा लांडगे व शरद पाटील यासनी पऱ्हेड करी अन् रणजित शिंदे यासनी आभार मानात. कार्यक्रम चांगला पार पाडासाठे संयोजन समितीना पदाधिकारी व कार्यकर्तासनी कष्ट लिधात.
