अमळनेर शहर व तालुक्यात विविध ठिकाणी महात्मा फुले यांची जयंती साजरी


अमळनेर : शहर व तालुक्यात दिनांक ११ एप्रिल रोजी महात्मा जोतीराव फुले यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात येऊन उपस्थितांनी अभिवादन केले.

महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल, देवगाव देवळी

देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त एक विशेष अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते. त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या कार्याची महती आणि त्यांच्या विचारांची गोडी विद्यार्थ्यांना अनुभवता आली. महात्मा फुले यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देण्यात आली. यातून विद्यार्थ्यांना समाजातील सुधारणा आणि शिक्षणाचे महत्त्व पटले. यावेळी शाळेतील शिक्षक आय. आर. महाजन, एस. के. महाजन, एच. ओ. माळी आणि शिक्षकेतर कर्मचारी देवेश पाटील, संभाजी पाटील, गुरुदास पाटील उपस्थित होते.

साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय, जानवे

अमळनेर तालुक्यातील जानवे येथील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय येथे क्रांती सूर्य महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते किरण टेलर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष डी. एम. पाटील होते. कार्यक्रमास सुरेश बापू, मधुकर नाना, युवराज पाटील, फुला भिला पाटील, भुषण अशोक पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथपाल विजय पाटील यांनी केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!