आ.अनिल पाटील यांच्या हस्ते श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान च्या २.४० कोटीच्या विकास कामांचे झाले भूमीपूजन

विकास कामांमुळे अमळनेरच्या धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार : खासदार स्मिता वाघ

अमळनेर : येथील श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान परिसराचा कायापालट करणाऱ्या २.४० कोटीच्या विकास कामांचे भूमीपूजन आ.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते काल दि. २० एप्रिल रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार स्मिता वाघ होत्या. याप्रसंगी मंचावर संस्थेचे ट्रस्टी संजय पाटील, संजय शुक्ल, अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, ॲड. व्ही. आर. पाटील, भिकन वाडीले, कृ. उ. बा. समिती संचालक हिरालाल पाटील, हेमंत पवार, भाजप शहराध्यक्ष विजय राजपूत, सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, मराठा समाज कार्यालयाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, खा. शि. मंडळाचे संचालक हरी भिका वाणी आदी मान्यवर उपस्थित होते. श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थानचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांनी ट्रस्टतर्फे उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला.

मान्यवरांच्या हस्ते श्री वर्णेश्वर मंदिर परिसरात चोपडा रोड ते श्री वर्णेश्वर महादेव मंदिर या रस्त्याचे भूमीपूजन, भक्तनिवास असलेल्या समाज भवनाचे भूमीपूजन, श्री वर्णेश्वर महादेव मंदिर परिसरातील तलावाचे सुशोभिकरण व मंदिर परिसराच्या वॉल कंपाऊंड चे नारळ फोडून व कुदळ मारून भूमीपूजन करण्यात आले. श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान परिसरात होत असलेली विकास कामे अमळनेरचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याचे आ. अनिल पाटील यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात खा. स्मिता वाघ यांनी श्री वर्णेश्वर महादेव मंदिर पुरातन असून नव्याने होणाऱ्या विकास कामांमुळे अमळनेरच्या धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी हेमंत भांडारकर, राजू फाफोरेकर, देविदास देसले, सुनिल पाटील, ॲड. तिलोत्तमा पाटील, महेश कोठावदे, डॉ. संजय शहा, गणेश पाटील, राजेंद्रभोला टेलर, भरत परदेशी, विजय पवार , रामराव पवार, सुरेश पाटील, सौ. पायल पाटील, अनिल कासार आदींसह शिवभक्त व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माराम चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामराव पवार, नारायण बडगुजर, राजू देसले, भावेश चौधरी, सतीश धनगर आदींसह श्री वर्णेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!