
अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील रहिवासी गं.भा इंदुबाई साहेबराव सूर्यवंशी यांचे आज दुपारी ४ वाजता वृद्धापकाळाने दुखद निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना, पाच मुली, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. जिजाबराव साहेबराव सूर्यवंशी व हरिविजय साहेबराव सूर्यवंशी यांच्या त्या मातोश्री होत. उद्या गुरुवारी दुपारी १२ वाजता निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !