‘दहावी बारावी नंतर करिअरच्या संधी’ या विषयावर १० व ११ मे रोजी अमळनेेर येथे कार्यशाळेचे आयोजन

पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा उपक्रम

अमळनेर : येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे दहावी बारावी नंतर विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर १० व ११ मे रोजी मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत युपीएससी, एमपीएससी, एनडीए, नीट, जेईई व विविध स्पर्धा परीक्षांविषयी उच्च पदस्थ अधिकारी व तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळा सकाळी ८.३० ते १२.३० यावेळेत राहील.

१० मे रोजी आयआरएस विशाल मकवाने अतिरिक्त आयकर आयुक्त नाशिक यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होईल अध्यक्षस्थानी डॉ. डिगंबर महाले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जयदीप पाटील, निवृत्त डीवायएसपी सुनिल नंदवाळकर, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, डॉ.अतुल सूर्यवंशी व संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
दिनांक ११ मे रोजी याच वर्षी युपीएससी उत्तीर्ण झालेले योगेश पाटील, आदिवासी विकास विभागाचे सह आयुक्त कपिल पवार, डीवायएसपी विनायक कोते, एरंडोलचे तहसीलदार प्रदीप पाटील, प्रभारी डीवायएसपी केदार बारबोले तसेच २०२३ च्या एमपीएससीत उत्तीर्ण जयकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी राहतील. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शना सोबत विविध स्पर्धांचे व बक्षिसांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी विद्यार्थी व पालकांनी कार्यशाळेत नाव नोंदणी साठी ८००७५३५०९३ /७०२०४३२८१६ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय (टाऊन हॉल) अमळनेर येथे संपर्क साधावा.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!