
अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराज इनडोअर हॉल येथे काल दिनांक २१ जून रोजी आंतर राष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. डॉ. अरुण जैन होते. प्रमुख पाहुणे म्हणून खा. शि. मंडळाचे सचिव तथा उप प्राचार्य प्रा. पराग पाटील, फार्मसी कॉलेज प्राचार्य रविंद्र सोनावणे, NCC कर्नल अमित रे, उप प्राचार्य विजय मांटे, उप प्राचार्या कल्पना पाटील, सिनेट सदस्य आणि जिमखाना प्रमुख डॉ. संदीप नेरकर आदी उपस्थित होते.
प्रा. अर्चना पाटील यांनी योग प्रात्यक्षिक घेतले व योग विषयावर उपयुक्त माहिती सर्वांना दिली. राष्ट्रीय खेळाडू हर्षदा संभाजी पाटील BCA ची विद्यार्थिनी हिने योगासने करून उपस्थितांची दाद मिळविली. यावेळी बटालियन चे अधिकारी, खेळाडू, NCC, NSS चे विद्यार्थी, शाळेतील विद्यार्थी इतर सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमृत अग्रवाल यांनी केले. डॉ. सचिन पाटील सर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. डॉ. हेमंत पवार, डॉ. प्रमोद चौधरी, प्रा. डॉ. सुनील राजपूत, प्रा. वैशाली महाजन, प्रशांत देवकाते, वैष्णवी पाटील, धनश्री पाटील, वृषाली पाटील यांनी सहकार्य केले.
