खवशी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी सुर्यकांत कापडे

व्हाईस चेअरमन पदी सौ. सुमनबाई मधुकर पवार

अमळनेर: तालुक्यातील खवशी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चेअरमन पदांची निवडणूक नुकतीच पार पडली. यात, सुर्यकांत कापडे यांची चेअरमन पदी तर व्हाईस चेअरमन पदी सौ. सुमनबाई मधुकर पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून एस. पी. महाजन व सोसायटी सचिव भरत पाटील यांनी काम पाहिले.


यावेळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक श्यामकांत देशमुख, गजानन सूर्यवंशी, चंद्रकांत सूर्यवंशी, उषाताई कापडे, महेद्र गोसावी, कैलास पाटील, नरेंद्र सूर्यवंशी यांचेसह माजी सरपंच अरूण देशमुख, माजी सरपंच लोटन भाऊसाहेब, माजी उपसरपंच गणेश बाविस्कर, उपसरपंच धनराज पवार, सरपंच प्रतिनिधी अरुण गोसावी, एकनाथ आबा, अर्जुन कापडे, संजय कापडे, विश्वास सूर्यवंशी, आंनदा गोसावी, सुनिल सूर्यवंशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल मराठे, जगतराव पवार, शशिकांत कापडे, आबा टेलर व ग्रामस्थ हजर होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!