चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र. दे येथील प्रा संजय आनंदा पवार यांची कन्या

अमळनेर : तालुक्यातील शिरुड येथील कै. विलास पंडित पाटील ह. मु. डोंबिवली यांची स्नुषा सौ. फाल्गुनी गणेश पाटील हिची भारत सरकारच्या परमाणू ऊर्जा ( Atomic Energy, Government of India Undertaking ) या विभागात २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन ‘सहाय्यक शास्त्रज्ञ’ या पदासाठी तिची नुकतीच निवड झाली. विशेष म्हणजे सौ. फाल्गुनी ने भारतात प्रथम व महाराष्ट्रातूनही ओबीसी गटातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र. दे येथील रहिवासी व हल्ली मुंबई स्थित प्रा. संजय आनंदा पवार यांची ती कन्या आहे.
मी धन्य झालो. बातमी ऐकून मी खूप भारावून गेलो. माझाच माझ्यावर विश्वास बसेना. माझी जीवनाची अंतिम इच्छा मुलीने पूर्ण केल्याने जीवनाचे सार्थक होऊन मनोमन तृप्त झालो. मुलीचीही भीष्म प्रतिज्ञा होती.. ‘करणार तर केंद्र सरकारचीच नोकरी करणार, अन्यथा नाही’. तिच्या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम. ….. प्रा. संजय पवार (वडील )
यापूर्वीही तीने इस्रो (Indian Space Research Organization ) च्या ‘सहाय्यक शास्त्रज्ञ’ परीक्षेत तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन थोड्यासाठी तिची नियुक्ती हुकली होती. मात्र तिने तिचे ध्येय विचलित न करता, न खचता आपले प्रयत्न सोडले नाही. या यशाचे श्रेय ती आई, वडील, गुरुजन व कुटुंबियांना देते. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन..!
