
अमळनेर : येथील जी. एस. हायस्कूलच्या लायन्स क्लब हॉलमध्ये सोमवार, दि.२८ जुलै रोजी सायंकाळी हरिश्चंद्र कढरे लिखित ‘मातंगाची शौर्य गाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन सोहळ्याला अध्यक्षस्थानी सामाजिक चळवळीचे अभ्यासक प्रा. अशोक पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रताप महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजय तुंटे, माजी गटशिक्षणाधिकारी आयु. अशोक बिऱ्हाडे आणि प्रा. डॉ. मारोती गायकवाड (चोपडा), डॉ. माधव वाघमारे (नंदुरबार) उपस्थित होते. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, लहुजी वस्ताद साळवे, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभ-हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रा.अशोक पवार यांनी अध्यक्षीय भाषणातून लेखकाचे अभिनंदन करुन ‘संविधान जागर’ संबधी मूलभूत स्वरूपाचे विचार व्यक्त केले. तर पुस्तकाचा अभिप्राय देताना प्रा. विजय तुंटे यांनी आपल्या म्हणाले की, हे पुस्तक वैचारिक व ऐतिहासिक स्वरूपाचे असून मातंग समाजाच्या शौर्याची अभंग गाथा या पुस्तकामुळे वाचकांपुढे आली आहे. प्रत्यक्ष निरीक्षण व सहभागातून ग्रंथाचे लेखन झाले आहे. ज्ञान संपादनासाठी आपण इतिहासाचे अध्ययन करणे आवश्यक आहे. आपल्या वैचारिक प्रेरणा व जाणिवेचे स्रोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत अशी वैचारिक भूमिका मांडली. प्रकाशन प्रसंगी प्रा. डॉ. मोरोती गायकवाड (चोपडा), श्री. उपासनी, आयु.अशोक बिऱ्हाडे, गोकुळ पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी बन्सीलाल भागवत, भटू पाटील, मुख्याध्यापक एम. ए. पाटील, राजेंद्र चव्हाण, जितेंद्र कढरे, प्रविण शिरसाठ, सुनिल गरुड, डॉ.राजीव कांबळे, श्री अवचिते, गौरव कढरे, ललित पाटील, गिरीश बेहेरे, शंकर कांबळे, डॉ.अमित पाटील, ग्रंथपाल दिपक पाटील, उपप्राचार्य डॉ. एच. डी. जाधव, प्रा.ज्ञानेश्वर कांबळे, डॉ. रवी बाळसकर, डॉ. बालाजी कांबळे, डॉ. माधव वाघमारे, प्रा. यादव बोयेवार, डॉ. डी. डी. कर्दपवार, प्रा. गोपाळ पाचवणे, अरुण सोनूमोरे, डॉ.संजीव मुसळे, राजू पाटील, कुलकर्णी, मैराळे, एस. टी. पाटील, उज्वल पाटील, गुलाब शिरसाठ, रामकृष्ण पाटील, मयूर वाघ, डी. एम. पाटील, संजीव थोरात यांच्यासह पत्रकार समाधान मैराळे, प्रविण बैसाणे, नूर खा पठाण, सुरेश कांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कृष्णा पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र चव्हाण यांनी तर आभार दयाराम पाटील यांनी मानले. याप्रसंगी साहित्यिक, वाचक, प्राध्यापक, नातेवाईक, मित्र परिवार आदी उपस्थित होते.
