अमळनेर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

कृषिमंत्र्यांचा राजीनामा व संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड यांना काळे फासणाऱ्यांवर कठोर कारवाई ची मागणी

अमळनेर : अमळनेर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने आज २२ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी व संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड यांना काळे फासणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे यासाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, प्रा. अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील, शहराध्यक्ष प्रशांत निकम काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, संदीप घोरपडे, मनोज पाटील, प्रताप आबा, प्रा. श्याम पवार, शरद नाना, भागवत गुरुजी सुलोचना ताई पाटील, योजनाताई पाटील, मनोहर नाना, प्रा. सुभाष पाटील, शिवसेनेचे चंद्रशेखर भावसार, गोकुळ कोळी, देवेंद्र देशमुख डॉ. रविंद्र पाटील, भास्कर बोरसे, सिंधू वानखेडे, कैलास आप्पा, योगेश शिसोदे, रियाज मौलाना आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!