दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी अमळनेर तालुका महाविकास आघाडीने घेतला पुढाकार

उपविभागीय अधिकारी यांना दिले मागण्यांचे निवेदन

अमळनेर : अमळनेेर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने आज दि. ३१ जुलै २०२५ रोजी दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष शांताराम सखाराम कोळी ( मांडळ) यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने आंदोलन करुन उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग, अमळनेर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात केलेल्या मागण्यांमध्ये.. दिव्यांग बांधवांसाठी शासकीय जागेवर तीन रूमचे घर बांधून देण्यात यावे, दिव्यांगांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देऊन नोकरी द्यावी, स्थानिक स्वराज्य संस्था व विधान परिषद मध्ये दिव्यांगांचा एक शासन स्विकृत प्रतिनिधी द्यावा, संजय गांधी योजनेचे दरमहा रुपये दहा हजार पेन्शन मिळावी, दिव्यांगांना घर टॅक्स, पाणीपट्टी यात शंभर टक्के सूट मिळावी, राज्य वित्त मंडळाच्या कर्जासाठी सरकारी जामीनदार पाहिजे ही अट रद्द करण्यात यावी अशा इतर अन्य मागण्यांचा समावेश आहे.

याप्रसंगी अमळनेर तालुका महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी यापुढे स्वतःचे दवाखान्यात दिव्यांगांना मोफत सेवा देण्यात येईल अशी ग्वाही दिली. संदीप घोरपडे यांनी राज्यपाल नियुक्त दिव्यांगांचा विधान परिषदेवर आमदार असला पाहिजे अशी सरकारकडे मागणी केली. तर शिवसेनेचे विजू मास्तर यांनी दिव्यांग बांधवांना वेळेवर पेन्शन मिळत नाही. त्यांना सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचे सांगितले.

यावेळी ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, ज्येष्ठ नेते प्रा. अशोक पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनगर अण्णा पाटील, संदीप घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, मनोज बापू, प्रताप आबा, प्रविण जैन, बन्सीलाल भागवत गुरुजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत दादा निकम, ॲड. शकील काझी, जाकीर शेख, अरुण शिंदे, किसान सेलचे तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, युवक अध्यक्ष योगेश शिसोदे, दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष डी. एम. कासार, महिला तालुकाध्यक्ष योजना पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्ष कविता पवार, शिवसेनेच्या मनीषा परब, शिवसेनेचे शहराध्यक्ष चंद्रशेखर भावसार, विलास पवार, बाळासाहेब पाटील, देवेंद्र देशमुख, मोहन भोई, गोकुळ कोळी, वासुदेव मामा, चिंधू वानखेडे, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच तालुक्यातून आलेले दिव्यांग बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एम. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन बी. के. सूर्यवंशी यांनी केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!