इंदिरा भवन येथे १० ऑगस्ट रोजी दि अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन

सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा भेटवस्तू देऊन होणार गौरव

अमळनेर : येथील दि अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता इंदिरा भवन, अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. अर्बन बँकेतर्फे शतक महोत्सवी वर्षानिमित्त गतवर्षी इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी या वर्गात ७५% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या बँकेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव समारंभ तसेच गरजू, गंभीर रुग्णांसाठी आरोग्य सेवा साधनांचे लोकार्पण कार्यक्रम देखील आयोजित केलेला आहे.

सभासदांना बॅंकेतर्फे आवाहन…

गतवर्षी इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी या वर्गात ७५% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या बँकेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा भेटवस्तू देवून गौरव करण्यात येणार आहे. याकरिता सभासदांनी आपल्या गुणवंत पाल्यांचे गुणपत्रकाची झेरॉक्स कॉपी बँकेच्या कार्यालयीन वेळेत बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील यांचेशी संपर्क साधून जमा करावेत असे आवाहन बॅंकेतर्फे करण्यात आले आहे.

बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर गरजू, गंभीर रुग्णांसाठी उपचारांनंतर लागणाऱ्या महागड्या आरोग्य सेवा साधनांचे लोकार्पण या सर्वसाधारण सभेत होणार आहे. तरी सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन चेअरमन पंकज मुंदडे, व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, व्यवस्थापक अमृत पाटील यांचे सह संचालक मंडळ यांनी केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!