पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या संघर्षाला यश; कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आनंद

जलशक्ती मंत्रालयाचे पाडळसरे प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करणेबाबत व त्यासाठी केंद्रशासनाचे ८५९.२२ कोटी रुपये निधीला मंजुरीचे पत्र


अमळनेर : पाडळसरे निम्न तापी सिंचन प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करून केंद्र शासनाने धरणासाठी ८५९.२२ कोटी रु.निधीला मंजुरी दिल्याचे पत्र नुकतेच प्राप्त होताच पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत व एकमेकांना पेढे भरवित आनंद व्यक्त केला. या प्रकल्पासाठी मागील दोन दशकांपासून पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचा संघर्ष सुरू होता. सदर निर्णयामुळे अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, धुळे, शिंदखेडा तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. यावेळी महिला पदाधिकारी यांनी फुगडी घालून आनंद व्यक्त केला.

या प्रकल्पासाठी प्रारंभी प्रकल्पाच्या मान्यतेसाठी PIB (Public Investment Board) ची बैठक झाली. अर्थ मंत्रालयाकडून विशेष बैठक घेण्यात येऊन प्रकल्पासाठी मान्यता देण्यात येऊन पुढील प्रक्रियेसाठी प्रकल्प जलशक्ती मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. अर्थ मंत्रालयाने सुचवलेल्या पूर्तता होऊन पुन्हा जलशक्ती मंत्रालयाकडून सदर प्रस्तावास अर्थ मंत्रालयाने पूर्ण तपासणी करुन अंतिम मंजुरी दिली. जलशक्ती मंत्रालयाने या प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करणेबाबत व त्यासाठी केंद्रशासनाचे ८५९.२२ कोटी रुपये निधीला मंजुरीचे पत्र अधिकृतपणे केंद्र सरकारच्या अर्थ विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. या प्रसंगी समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, अर्बन बँकेचे व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे, महेंद्र बोरसे, हिरामण कंखरे आदींनी मनोगत व्यक्त केले.

या निर्णयासाठी खासदार स्मिता वाघ, माजी मंत्री आ.अनिल पाटील, यांचेसह केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मलाजी सीतारामन, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचेसह लढ्यात सहभागी असलेले अमळनेर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचे समितीतर्फे जाहीर आभार व्यक्त करण्यात आलें. यावेळी सुभाष चौधरी, रणजित शिंदे, हेमंत भांडारकर, हिरामण कंखरे, प्रताप साळी, महेश पाटील, सुनिल पाटील, देविदास देसले, सौ.उषाबाई चौधरी, सौ.वसुंधरा लांडगे, सौ.पायल पाटील, सौ. माधुरी पाटील, प्रशांत भदाणे, सुनिल भोई, सुरेश पाटील,महेंद्र बोरसे, ॲड.कुंदन साळुंखे, रामराव पवार, रहेमतुल्ला पिंजारी, लोटन पाटील, पुरुषोत्तम शेटे, कृषिभूषण सतिश काटे, गोकुळ पाटील, सुशिल भोईटे, दिलीप पाटील, मनोहरनाना पाटील, दशरथ लांडगे, अधिकराव पाटील, नारायण पाटील, दिलीप पाटील, राजेंद्र देसले, भावेश चौधरी, पंकज भोई आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!