विविध आदिवासी संघटनांचा सहभाग; भव्य शोभायात्रा काढून विश्व आदिवासी दिवस साजरा

अमळनेर : येथील मंगळ ग्रह मंदिर परिसरातील भव्य पटांगणावर विविध आदिवासी संघटनांच्या सहभागातून विश्व आदिवासी दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाने साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी बंधू भगिनींनी वाजत गाजत भव्य शोभायात्रा काढली. यावेळी आदिवासी क्रांतिकारक व महामानवांचे स्मरण करण्यात आले. मंचावर आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक गीते सादर केली सोबतच आदिवासी बांधवांसह आदिवासी नृत्य केले. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन कला सादर करणाऱ्या आदिवासी कलाकारांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांचे तर्फे सन्मानचिन्ह व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय पवार यांनी केले.
यावेळी मंचावर आदिवासी पा. क्रांती संघटनेचे अध्यक्ष मुकेश साळुंखे, अमळनेर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, आदिवासी संघटनेचे महासचिव दिपक भाऊ खांदे, सामाजिक कार्यकर्ते गुलाब बोरसे, महेंद्र पवार, भगवान सैंदाणे, सौ. सखुबाई पवार, सचिव अमोल सुर्यवंशी, राज्य प्रसिद्धी प्रमुख दिनेश चव्हाण, कमलेश चव्हाण, आनंद पवार, जगदीश साळुंखे, आनंद चव्हाण, संजय पारधी, धनराज पवार, राजा सोनवणे, पंकज पारधी, विकास पवार, रावसाहेब पवार यांची उपस्थिती होती.

यानंतर आदिवासी सांस्कृतिक मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात येऊन मिरवणूक अंमळनेर शहरातून जल्लोषात वाजत गाजत निघाली. ताडेपुरा, पैलाड, डॉ. आंबेडकर पुतळा, समशेरसिंग चौक, बाजार, पाचपावली मंदिर, बस स्टँड मार्गे महाराणा प्रताप चौक येथे मिरवणुकीचा समारोप झाला. आदिवासी दिनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंगळ ग्रह सेवा संस्थानचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साठी अजय पवार, रोहित ठाकरे, आकाश पवार, दादा पवार, अर्जुन महाले यांचेसह आदिवासी युवक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
