स्वातंत्र्यदिनी होणार लैंगिक शिक्षणावर आधारित ‘तिमिरातुनी तेजाकडे’ पुस्तिकेचे प्रकाशन

अमळनेर : येथील प्रसिध्द स्त्री रोग तज्ञ डॉ जयेश शिंदे लिखित तिमिरातुनी तेजाकडे या लैंगिक शिक्षणावरील पुस्तिकेचे प्रकाशन स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता सानेगुरुजी विद्यालयात होणार आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, डॉ. डिगंबर महाले आदींच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून संदीप घोरपडे, गोकुळ बागुल, शिवाजीराव पाटील, सतीश देशमुख, डॉ. अपर्णा मुठे, रावसाहेब मांगो पाटील हे असणार आहेत. डॉ जयेश शिंदे लिखित व धनंजय सोनार यांनी शब्दांकन केलेल्या या पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. जयेश शिंदे व डॉ. प्रतिज्ञा शिंदे यांनी केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!