
अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील रहिवासी गं.भा अनुसयाबाई माणिक कापडे यांचे आज दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना, दोन मुली, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवृत्त कर्मचारी छबिलाल माणिक कापडे व सुनील माणिक कापडे यांच्या त्या मातोश्री होत. उद्या गुरुवारी दि.१४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार, दिनांक २२ ऑगस्ट रोजी तसेच गंधमुक्त व उत्तरकार्य शनिवार, दिनांक २३ ऑगस्ट रोजी करण्याचे आयोजिले आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !