कार्यकाळ पूर्ण झाल्याने दि अमळनेर अर्बन बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा स्वेच्छेने राजीनामा

अर्बन बँकेने ऑनलाईन बँकिंग सुविधा साठी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण; बँक ऑनलाईन होणार

अमळनेर : दि.अमळनेर अर्बन को.ऑप.अर्बन बँकेत कार्यरत राहिलेले चेअरमन पंकज मुंदडे, व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे यांनी आपल्या पदाचा एक वर्ष कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी नुकताच स्वेच्छेने राजीनामा दिला. खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत सदर राजीनामा मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे ज्येष्ठ संचालक प्रविण जैन होते. दि.अमळनेर अर्बन को.ऑप.अर्बन बँकेचे शतकमहोत्सवी वर्षात अर्बन बँकेने ऑनलाईन बँकिंग सुविधा सुरु करण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण केली असून त्याची मंजुरीही मिळवली असल्याचे अमळनेर अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडा यांनी यावेळी जाहीर केले. वर्षभर केलेल्या भरीव कामगिरीसाठी संचालक मंडळाने केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

व्हाईस चेअरमन रणजीत शिंदे यांनी शतक महोत्सव वर्षात बँकेच्या झालेल्या भरभराटीसाठी संचालक मंडळाने एकदिलाने केलेल्या कामामुळे यश मिळाले. हे यश सर्वांचे सामुहिक यश आहे असे सांगत नवीन संचालक म्हणून विश्वासाने दिलेल्या संधीबद्दल उपस्थित संचालकांचे आभार मानले. सभेचे अध्यक्ष प्रविण जैन यांनी लवकरच नवे चेअरमन, व्हॉईस चेअरमन निवड करण्याची कार्यवाही नियमानुसार केली जाईल असे यावेळी सांगितले. संचालक पंडित चौधरी यांनी आभार मानले. याप्रसंगी संचालक लक्ष्मण महाजन, भरतकुमार ललवाणी, प्रदीप अग्रवाल, दिपक साळी, अभिषेक पाटील, प्रविण पाटील, ज्येष्ठ संचालक मोहन सातपुते, सौ. वसुंधरा लांडगे, डॉ. मनीषा लाठी, अँड. विजय बोरसे आदी उपस्थित होते. सभेचे कामकाज बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील यांनी पाहिले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!