
अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) क्रीडा विभाग यांच्या तर्फे २९ ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खा. शि मंडळाचे सचिव व उप प्राचार्य प्रा. पराग पाटील होते. सोबत व्यासपीठावर उप प्राचार्य प्रा. डॉ. एच. डी. जाधव, उप प्राचार्या प्रा. डॉ. कल्पना पाटील, उप प्राचार्य डॉ. योगेश तोरवणे, डॉ. डी. आर. चौधरी, डॉ. नलिनी पाटील, डॉ. अमोल मानके, डॉ. अवीत पाटील, डॉ. रवि मराठे, डॉ. जे. टी. साळवे, प्रा. अर्चना पाटील, क्रीडा प्रशिक्षक सचिन पवार, मच्छिन्द्र पारधी उपस्थित होते. मान्यवरांनी प्रतिमा पूजन व विविध खेळातील खेळाडूंचे स्टॅचू यांचे अनावरण केले.
यानंतर ज्युदो खेळातील खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट खेळ केले. डॉ. एच. डी. जाधव यांनी खेळाडूंना मार्गदर्शन पर उपयुक्त माहिती सांगितली. विद्यापीठ अधिसभा सदस्य वा जिमखाना समन्वयक डॉ. संदीप नेरकर यांनी मनोगत व्यक्त करताना क्रीडा दिवसाविषयी महत्व सांगितले. मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठ खेळाडूंचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बॅडमिंटन, बुद्धिबळ, मास रेसलिंग स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या. राष्ट्रीय क्रीडा दिवस कार्यक्रमाचे आयोजन वरिष्ठ महाविद्यालय क्रीडा संचालक डॉ. सचिन पाटील, ज्युदो प्रशिक्षक सचिन वाघ, प्रशांत देवकाते यांनी केले.. सूत्रसंचालन डॉ. अवीत पाटील सर यांनी केले तसेच सर्व कनिष्ठ व वरिष्ठ क्रीडा विभागातील खेळाडूंनी सहकार्य केले.