
अमळनेर : ‘मिल के चलो असोसिएशन’ चा ६ वा वर्धापनदिन नुकताच संपन्न झाला. रॉयल उर्दू स्कुल, अमळनेर येथील शाळेत मंगळवार, दि ९ सप्टेंबर २०२५ रोजी ‘सोप्या प्रयोगातुन विज्ञान’ या विषयावर सत्र घेण्यात आले. या सत्रात प्रा. विनायक पाटील यांनी सोप्या साहित्यातील ९ प्रयोग घेतले. सत्रात इयत्ता ५ वी ते ९ वी चे मुलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. सत्राला २१० विद्यार्थी हजर होते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातील अनेक प्रश्न विचारुन सत्रातील रंजकता वाढवली.
या कार्यक्रमाला प्रताप महाविद्यालयातील नॅनो टेक्नॉलॉजी चे प्रा. डॉ. एस. डी. बागुल, शिवाय शाळेच्या मुख्याध्यापिका खान मॅडम, इतर शिक्षक विज्ञान शिक्षक देखील उपस्थित होते. सत्राच्या शेवटी काही विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. विज्ञान शिक्षक नदीम सर आणि नावीद सर यांनी कार्यक्रमाबाबत प्रतिक्रिया देऊन पुढील भेटीचे आमंत्रण दिले व आभार मानले.