अमळनेर : अतिवृष्टी व परतीच्या पावसाने सर्वत्र नुकसान केले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान, काहींच्या घरांची पडझड यामुळे समाजातील प्रत्येक घटक अडचणीत आला आहे. विद्यार्थ्याना परीक्षा शुल्क व पास शुल्क भरण्याची चिंता आहे. हे शुल्क शासनाने माफ करावे यासाठी अभाविप संघटनेने तहसीलदार मिलिंद वाघ यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होणार असून त्यांना शुल्क माफ करुन दिलासा द्यावा, कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये अशी मागणी अभाविपचे शहरमंत्री निलेश पवार, विद्यर्थिनी प्रमुख प्रगती काळे , केशव पाटील, रोहित पवार, प्रितेश पाटील, ऋषिकेश पाटील यांनी केली आहे.