अमळनेर येथील कांताबाई पहाडे यांचे वार्धक्याने निधन; मरणोत्तर देहदानाची संकल्पपूर्ती

अमळनेर : येथील माजी नगराध्यक्ष स्व. रतनलालजी पहाडे यांच्या धर्मपत्नी कांताबाई पहाडे यांचे मंगळवारी रात्री वार्धक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९० वर्षांच्या होत्या. अध्यात्मिक वृत्तीच्या कांताबाईंनी सामाजिक जाणीवेतून मरणोत्तर देहदानाचा संकल्प केलेला होता. ईच्छेनुसार, मुलगा पप्पू पहाडे यांनी लायन्स क्लब चे पदाधिकारी व नातेवाईक यांचेसह धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेज मध्ये जाऊन आईचा मृतदेह दान केला. येथील ग्लोबल स्कूल मागील चिंतामणी कॉलनीतील निवासस्थानी दर्शनाकरिता त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता. अनेकांनी दर्शन घेतले व त्यांना श्रद्धांजली वाहिली. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली..!

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!