मराठा मंगल कार्यालय, अमळनेर येथे २२ सप्टेंबर पासून शारदीय व्याख्यानमालेस प्रारंभ

अमळनेर : सालाबादाप्रमाणे मराठी वाङ्‌मय मंडळ आणि प्रा.आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय,अमळनेरतर्फे दिनांक २२ ते २६ सप्टेंबर दरम्यान शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा मंगल कार्यालय, अमळनेर येथे सोमवार, दिनांक २२ सप्टेंबर रोजी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते शारदीय व्याख्यानमालेचे उद्घाटन होईल. जळगावच्या खासदार स्मिता उदय वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभेल. दिनांक २२ ते २६ सप्टेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ६.३० वाजता व्याख्यानमालेला सुरुवात होईल.

सोमवार, दिनांक २२ सप्टेंबर रोजी मुंबई येथील प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार हे व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतील. एका संगीतकाराची मुसाफिरी (किस्से, गाणी आणि अनुभव) हा त्यांचा विषय आहे. मंगळवार, दिनांक २३ सप्टेंबर रोजी सुप्रसिद्ध मराठी कवी अशोक बागवे (ठाणे), अरुण म्हात्रे (ठाणे) हे दोन्ही कवी दुसरे पुष्प गुंफतील. काव्यसंध्या (सुमधुर मराठी कवितांचा सुंदर कार्यक्रम) हा त्यांचा विषय आहे. बुधवार, दिनांक २४ सप्टेंबर रोजी पुणे येथील समाजसेविका सुप्रसिद्ध गझलकार ममता सिंधुताई सपकाळ या ‘हा खरा जीवन प्रवास’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफतील. गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी जळगाव येथील इंजि. सुधीर वाघुळदे व डॉ. राहुल भोईटे हे दोन्ही ‘आनंदी पालकत्व (सकारात्मक दृष्टिकोन) ‘ या विषयावर चौथे पुष्प गुंफतील. शुक्रवार, दिनांक २६ सप्टेंबर रोजी मुंबई येथील सिने अभिनेता, लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण हे ‘कला क्षेत्राचा समाज मनावर होणारा प्रभाव’ या विषयावर पाचवे पुष्प गुंफतील.

अमळनेरकरांसह रसिकांसाठी पर्वणी असणारी शारदीय व्याख्यानमाला मराठा मंगल कार्यालय, अमळनेर येथे दररोज सायंकाळी ६.३० वाजता होईल. या व्याख्यानमालेस उपस्थितीचे आवाहन मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेरचे अध्यक्ष डॉ. अविनाश
जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, सोमनाथ ब्रह्मे, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारणी सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. शीला पाटील, स्विकृत सदस्य अजय केले, बजरंगलाल अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे, जगदीश कुलकर्णी यांनी केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!