
अमळनेर : सकल धनगर समाज व राजे मल्हार होळकर प्रतिष्ठान तर्फे एस.टी.आरक्षण अंमलबजावणीसाठी जालना येथील उपोषण कर्ते दिपक बोराडे यांच्या समर्थनार्थ व पाठिंबा देण्यासाठी मा. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना धनगर समाज बांधवांतर्फे नुकतेच निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, एस.टी.आरक्षण अंमलबजावणी संदर्भात शासनाच्या शेकडो बैठका झाल्या, अनेक आंदोलने झाली. बारामती येथे धनगर समाजाच्या लाखोंच्या जनसमुदायाला संबोधित करताना मा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी S.T. आरक्षणाबाबत दिलेला शब्द पाळला नाही म्हणून आमचे बांधव दिपक बोराडे दिनांक १७ सप्टेंबर २०२५ पासून नियोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, जालना येथे उपोषणास बसले आहे. त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे तरी या उपोषण आंदोलनाची दखल घेतली नाही. तरी आपण दोन दिवसाच्या आत धनगर जमातीच्या घटना दत्त एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करून दिपक बोराडे यांचे उपोषण तात्काळ सोडवावे अन्यथा दिपक बोराडे सांगतील त्या पद्धतीने धनगरी बाणाने राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जाईल. तरी उपोषणकर्त्याच्या मागण्यांना शासनाने तातडीने प्रतिसाद द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या निवेदनावर बन्सीलाल भागवत, एस. सी. तेले, प्रदीप कंखरे, रमेशदेव शिरसाठ, आनंदा हडप, ए. बी. धनगर, दिलीप खांडेकर, तुषार इदे, संजय धनगर मांडळ, रमेश धनगर, दशरथ युवराज लांडगे, विजय हिवराळे, सचिन शिरसाठ, दत्तात्रय धनगर, नामदेव ठाकरे, तुकाराम ठाकरे, परशुराम ठाकरे धानोरा आदींच्या सह्या आहेत.