मारवड येथे बदली झालेल्या शिक्षकांना निरोप व नव्याने रुजू शिक्षकांचे स्वागत

शाळा व्यवस्थापन समिती मारवड कन्या, ग्रामपंचायत मारवड व मारवड विकास मंच तर्फे कार्यक्रमाचे आयोजन

अमळनेर : तालुक्यातील मारवड येथील शाळा व्यवस्थापन समिती मारवड कन्या, ग्रामपंचायत मारवड व मारवड विकास मंच तर्फे शनिवार, दिनांक २० सप्टेंबर रोजी बदली झालेल्या सर्व शिक्षकांना निरोप व नव्याने रुजू शिक्षकांचे स्वागत असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मारवड गावच्या लोकनियुक्त सरपंच आशाबाई पवार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, केंद्रप्रमुख अशोक सोनवणे, उपसरपंच भिकनराव पाटील, ग्रामपंचायत सदस्या उज्वला पाटील, कविता चौधरी, निवृत्त प्राचार्य एल. जी. चौधरी, मारवड विकासमंचचे अध्यक्ष राकेश गुरव, उपाध्यक्ष गोकुळ साळुंखे, महेश साळुंखे उपस्थित होते. सर्वप्रथम आयोजकांतर्फे प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारवड कन्या शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे यांनी केले .

ऑनलाईन जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमुळे गावातील मारवड कन्या व मारवड बॉईज या दोन्ही शाळांचे बदलीमुळे कार्यमुक्त शिक्षकांना निरोप तसेच त्याजागी नव्याने नियुक्तीने हजर झालेल्या शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. मारवड कन्या शाळेतील मनिषा निकम, दिनेश मोरे व शारदा जाधव तसेच मारवड बॉईज शाळेतील स्वाती पाटील, सारिका काटके, गणेश चव्हाण व श्याम वाघ या शिक्षकांना निरोप देण्यात आला. त्यांच्या जागी स्वागतार्थी शिक्षक- (मारवड कन्या शाळेत दत्तात्रय सोनवणे, चेतना बिऱ्हाडे व सुधीर पाटील यांची तर मारवड बॉईज शाळेत महेश बोरसे, गिरीष पाटील व सविता पाटील या शिक्षकांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रमुख अतिथी प्राचार्य एल.जी.चौधरी यांनी मारवड कन्या शाळेने लोकसहभागातून गुणवत्तापूर्ण भौतिक सुविधा जसे डिजीटल क्लास, परिपाठ मंच, इंटरनेट सुविधा, CCTV कॅमेरा, परसबाग, बाला उपक्रम, हँडवॉश स्टेशन, पुस्तकालय, स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक सहल, सांस्कृतिक कार्यक्रम असे अनेक उपक्रमांची माहिती देऊन निरोपार्थी व स्वागतार्थी शिक्षकांच्या कार्याविषयी माहिती दिली. कु. जान्हवी साळुंखे व दिव्याणी साळुंखे या माजी विद्यार्थीनींनी व शिक्षक गणेश चव्हाण व दिनेश मोरे या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष शेखर पाटील, सदस्य सदगुरु कोळी, चेतन चव्हाण, किरण पारधी, कविता साळुंखे, सुनिता पाटील, छाया पाटील, ज्योती पवार, शारदा बडगुजर, सुभाष पवार, निंबाजी पाटील, सुभाष पाटील, रुपेश साळुंखे, अरुणकुमार साळुंखे, प्रभाकर पानपाटील, उमेश चौधरी, मंगलबाई साळुंखे, रोहित साळुंखे, उमेश चौधरी, गोपाल बडगुजर, अशोक कोळी, निलेश बोरसे, समाधान शिंदे, किशोर पाटील, पुष्पाबाई पाटील, सुदीप साळुंखे, विलास पाटील, बशीर शेख, संजय पवार, अमोल पाटील, नामदेव पाटील, शितल चव्हाण दोन्ही शाळांतील आजी-माजी विद्यार्थी तसेच मारवड, बोरगाव, गोवर्धन गावातील पालक व मारवड विकास मंचचे सदस्य आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर पाटील यांनी तर गिरीष पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मारवड कन्याशाळेचे smc अध्यक्ष श्रीकांत साळुंखे, उपाध्यक्ष शेखर पाटील, सदस्य सदगुरु कोळी, चेतन चव्हाण, बशीर शेख व युवा प्रशिक्षणार्थी सुदिप साळुंखे यांनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!