गेली तीस वर्षातील संघर्ष व केलेला प्रवास उलगडला.

(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथील श्री दत्त विद्यामंदिर या शाळेच्या सन १९९४-९५ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा स्नेहबंध मेळावा तीर्थक्षेत्र माहीजी देवी देवस्थान, पातोंडा येथे नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी मुख्याध्यापक व प्राचार्य श्री दे. रा. जगताप होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील निवृत्त शिक्षक आर .एस .पटवे, आर. डी. पवार, धर्मराज झंजने, आर. जी. शिंदे, गांगुर्डे मॅडम, प्रदीप लोहारे, व्ही. सी. पाटील, विजय झंजने, राजू संदानशिव तसेच दिवंगत शिक्षकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वप्रथम शाळेची प्रार्थना होऊन विद्यार्थ्यांची हजेरी घेतली. त्यानंतर दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.
दिवंगतांना वाहिली श्रद्धांजली..!
शाळेत सोबत शिक्षण घेत असताना अनुभवलेले व नंतरच्या काळातील दिवंगत शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
स्नेहबंध मेळाव्यात उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपला परिचय देऊन तीस वर्षाच्या कालखंडातील संघर्ष व केलेला प्रवास उलगडून सांगितला. यात किरण शिंदे, हिरालाल माळी व शरद ठाकरे यांनी जीवनाच्या संघर्षाची मांडलेली कथा सर्वांना मन हेलावून टाकणारी होती. यानंतर शिक्षक आर. जी. शिंदे, धर्मराज झंजने व प्रदीप लोहारे यांनी बोधप्रद असे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणातून शाळेचे माजी मुख्याध्यापक दे. रा. जगताप यांनीही मार्गदर्शन केले. शेवटी सर्वांनी रुचकर जेवणाचा आस्वाद घेऊन आठवणी सोबत नेल्या.
स्नेहमेळावा कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी अश्विनी जोशी, अश्विनी पवार, साधना बोरसे, मनिषा महाले, शारदा पवार, बबिता चव्हाण, नम्रता बागुल, सुनिता शिरसाट, रेखा सूर्यवंशी, वंदना लोहार, शितल राठोड, सुनीता पवार, अनिता पवार, जयश्री पवार, सोनाली जाधव तर विद्यार्थ्यांमध्ये प्रवीण लाड, सुरेश पाटील, अविनाश पाटील, शंकर माळी, काशिनाथ सोनवणे, किरण शिंदे, गोकुळ पाटील, दत्तात्रेय कोळी, दिनकर पवार, बाळासाहेब शिरसाट, दिलीप बिरारी, प्रल्हाद बोरसे, प्रवीण धुमाळ, ज्ञानेश्वर कोळी, सुनील सैंदाणे, भुरा संदानशिव, विजय मुसळे, योगेंद्र पवार, रावसाहेब पाटील, विनोद बाविस्कर, विनोद सोनवणे, शरद ठाकरे, निंबा भोई, संजय बिरारी, अतुल पवार, सतीश वाडीले, समाधान बिरारी, हिरालाल माळी आदी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी पवार, प्रवीण लाड व शरद ठाकरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रवीण लाड, किरण शिंदे, सुरेश पाटील, हिरालाल माळी, शरद ठाकरे, अतुल पवार, अश्विनी पवार, अश्विनी जोशी, सुनिता पवार यांनी परिश्रम घेतले.