सुप्रसिद्ध डॉ. अपर्णाताई मुठे यांचे अल्पशा आजाराने निधन

(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : येथील रहिवासी तथा सुप्रसिद्ध डॉ. अपर्णाताई शेखर मुठे यांचे जळगाव येथे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्या वय ८४ वर्षांच्या होत्या. सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ् डॉ. राहुल मुठे यांच्या त्या मातोश्री होत. महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी आपले आयुष्य झोकून दिले होते. महिला मंच ट्रस्ट, अमळनेर च्या अध्यक्षा होत्या. त्यांनी सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांचे हसरे व्यक्तिमत्त्व, सेवाभावी वृत्ती, समाजासाठीची तळमळ आणि महिलांसाठी केलेले कार्य सदैव आपल्या स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने अमळनेर शहरावर शोककळा पसरली आहे. त्यांची अंत्ययात्रा सकाळी १० वाजता राहत्या घरून निघणार आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली..!

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!