अमळनेर येथे ‘वृक्षारोपण अभियान २०२६’ कार्यक्रम अंतर्गत ‘एक पेड़ मां के नाम’

अमळनेर रोटरी क्लब, नगर परिषद, महिला हाऊसिंग ट्रस्ट, पर्यावरण सखी व सामाजिक वनीकरण विभाग यांचा सहभाग

(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : पर्यावरण, वृक्ष संवर्धन आणि हरित अमळनेर घडविण्याच्या उद्देशाने येथील रोटरी क्लब, नगर परिषद, महिला हाऊसिंग ट्रस्ट, पर्यावरण सखी व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “वृक्षारोपण अभियान २०२६” कार्यक्रम अंतर्गत “एक पेड मा के नाम” हा उपक्रम नुकताच दि. ७ जुलै २०२६ रोजी पार पडला. रो. अजयभाऊ केले यांच्या घरासमोरील खुल्या जागेत हा उपक्रम राबविण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल श्रीमती सुनीता धनगर, वनरक्षक श्रीमती अलका पाटील व वनरक्षक जगदीश ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी रो. अजय केले यांच्या धर्मपत्नी सौ. विनिता अजय केले यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरणपूरक पद्धतीने वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. डॉक्टर शिबी वशिष्ठ यांनी आपल्या “भाग्यश्री” या शेळ्यांच्या लेंड्यापासून तयार केलेले सेंद्रिय खत वृक्षांच्या वाढीसाठी भेट दिले. हे खत वृक्ष टवटवीत राहून त्यांची वाढ जलद व्हावी यासाठी उपयुक्त ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले.

रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. महेश पाटील आणि सचिव रो. प्रशांत निकम यांनी सांगितले की, वन महोत्सवाच्या माध्यमातून “एक पेड मा के नाम” हा संदेश घराघरात पोहोचवणे आवश्यक आहे. प्रोजेक्ट चेअरमन रो. अजय केले व रो. आशिष चौधरी यांनी प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहन केले. यावेळी रोटरी क्लबचे सदस्य विवेक देशमुख, अजय रोडगे, किर्तीकुमार कोठारी, दिनेश रेझा, प्रतीक जैन यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमींनी सहभाग नोंदविला. “एक झाड लावूया… पर्यावरण वाचवूया” या संदेशासह कार्यक्रमाची सांगता झाली. रोटरी क्लब चे पीआरओ मकसूद बोहरी यांनी माहिती दिली.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!