साने गुरुजी कन्या हायस्कूल व नुतन माध्यामिक शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : साने गुरुजी कन्या हायस्कूल व नुतन माध्यमिक शाळेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी झाली. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जय योगेश्वर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांचे समवेत साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल पाटील व कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे व शिक्षक वृंद उपस्थित होते. मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले. मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. लोकमान्य टिळक यांच्या विषयी स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग या विषयावर माहिती सांगितली.

अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा परिचय देताना प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी अण्णाभाऊंनी स्वातंत्र्य लढ्यासाठी कोणते योगदान दिले ? जातीवादाविषयी कसे लढले ? याविषयी माहिती सांगितली. अध्यक्षीय भाषणात संदीप घोरपडे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन डी. ए. धनगर यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांनी केले .

दुसऱ्या सत्रात साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती अनिता बोरसे मॅडम होते. प्रास्ताविक डी. आर. महाजन यांनी केले. शिक्षक दिलीप पाटील व आर. एम. देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. हर्षिता भामरे , किंजल भोई व कृतिका पाटील या विद्यार्थीनींनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. हिताक्षी भदाणे, कल्याणी शिंदे यांनी सूत्रसंचालन तर पाटील यांनी आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!