धनदाई महाविद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न, लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जयवंतराव पाटील यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. जयवंतराव पाटील होते.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य क्षेत्रातील बहुमोल योगदानासह सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी उभारलेल्या विविध चळवळीतील कार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्वही अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा मिनाक्षी इंगोले यांनी तर आभार प्रदर्शन मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रशांत पाटील यांनी केले. याप्रसंगी प्रा. डॉ. किशोर पाटील, डॉ. राहुल इंगळे, डॉ. संगीता चंद्राकर, डॉ. रमेश पावरा, डॉ. भगवान भालेराव, प्रा. डॉ. महादेव तोंडे, डॉ. प्रवीण पवार यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!