
(दिव्यचक्र वृत्तसेवा)
नागपूर : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व ग्रामीण विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल साने गुरुजी फाउंडेशन, अमळनेर चे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना प्रतिष्ठेचा ‘ऑरेंज सिटी आयकॉन अवॉर्ड २०२६’ ज्येष्ठ समाजसेवक दत्ताभाऊ बारगजे यांच्या शुभहस्ते ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन नागपूर येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात नुकताच प्रदान करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.
साने गुरुजी फाउंडेशनच्या माध्यमातून श्री. नरेंद्र पाटील यांनी शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, व्यसनमुक्ती, युवक सक्षमीकरण, महिला सबलीकरण, पर्यावरण संवर्धन तसेच एचआयव्ही/एड्स जनजागृती अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या समाजाभिमुख कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मुक्ता भारद्वाज (विश्व युवा केंद्र, नवी दिल्ली), शीतल पाटील (अध्यक्ष, महिमा बहुउद्देशीय संस्था, नागपूर), बबीता ध्रुव (नागपूर), दयानंद कुबळ (मुंबई), जयंत पाठक (डायरेक्टर, ऑल इंडिया सेल्फ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन) तसेच बंडू आबटकर (अमरावती) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.