विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा, वक्तृत्व (आशु भाषण) स्पर्धा

(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात हिंदी विभाग व बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी राजभाषा हिंदी दिवसाचे आयोजन करण्यात आले. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सुमारे शंभर विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रा. डॉ. भगवान भालेराव, प्रा. डॉ. रवि बालसकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ बडोदा चे मुख्य प्रबंधक अनामलामूरी सैंदूलू उपस्थित होते. सोबत महाविद्यालय चे प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, उप प्राचार्या डॉ.कल्पना पाटील, उप प्राचार्य अशोक पाटील, उप प्राचार्य व्ही.बी.मांटे, हिंदी विभागाध्यक्ष डॉ. शशिकांत सोनवणे ‘सावन’, प्रो. कुबेर कुमावत, प्रा.शालिनी पवार, प्रा. देवेंद्र वानखेडे, सहा. प्रा. के.पी.बागुल, सहा. प्रा.किशोर सोनवणे आदी उपस्थित होते. हिंदी विभागाध्यक्ष शशिकांत सोनवणे ‘सावन’ यांनी प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

प्रास्ताविक करताना शशिकांत सोनवणे यांनी राजभाषा हिंदीचे वर्तमान स्थान, रोजगार व नौकरी या बाबत माहिती विषद केली.
स्नातक स्नातकोत्तर हिंदी विभागामार्फत हिंदी राजभाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा, वक्तृत्व (आशु भाषण) स्पर्धा घेण्यात आल्या. यात विशेष प्रविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले. यासाठी बँक ऑफ बडोदा ने आर्थिक सहाय्य दिले. स्पर्धा कनिष्ठ स्तर (11वी व 12 वी ), वरिष्ठ स्तर (पदवी अभ्यासक्रम) व तिसरा स्तर (पदव्युत्तर अभ्यास क्रम) अशा तीन स्तरांवर विभागणी करण्यात आली होती.
- वक्तृत्व स्पर्धेत विशेष प्रविण्य मिळविलेले विद्यार्थी :
- कु. मिताली मनोहर पाटील (प्रथम – कनिष्ठ विभाग), कु. सायली योगराज पाटील (प्रथम – वरिष्ठ विभाग), कु. अश्विनी आधार महाजन (प्रथम – स्नातकोत्तर वरिष्ठ विभाग)
- सामान्य ज्ञान प्रतियोगितेत विशेष प्रविण्य मिळविलेले विद्यार्थी : कु. वंशिका भिका स्वामी (प्रथम – कनिष्ठ विभाग), स्वप्निल रविंद्र मोरे (प्रथम – वरिष्ठ विभाग) व ज्ञानेश्वर हिरामण पाटील (प्रथम – स्नातकोत्तर वरिष्ठ विभाग)
यावेळी हिंदी विषयातुन पीएच. डी. संशोधन करणाऱ्या बापू पाटील, मुरलीधर वसावे व सौ. सारिका पाटील या शोधार्थ्यांनी आपल्या स्वच्छेने हिंदी विभागाला स्वयंचलित संयंत्र व विद्युत संरक्षित विजेरी (इनवर्टर व बैटरी)भेट दिली. कार्यक्रमास वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यायातील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.पी.बागुल यांनी केले तर कुबेर कुमावत यांनी आभार मानले. सामूहिक राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.