एल.सी.डी. प्रोजेक्टरच्या माध्यमातून SNA SPARSH प्रणालीची प्रत्यक्ष ऑनलाइन प्रक्रिया व कार्यपद्धतीचे प्रात्यक्षिक

(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : गटसाधन केंद्र, पंचायत समिती अमळनेर यांच्या वतीने तालुक्यातील केंद्र समन्वयक, जिल्हा परिषद, नगर परिषद व शासकीय आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, साधन व्यक्ती, IED तालुका समन्वयक व विशेष शिक्षक यांच्यासाठी SNA SPARSH कार्यपद्धती हाताळणी प्रशिक्षण नुकतेच दि.१ ऑक्टोबर रोजी आय.एम.ए. हॉल येथे आयोजित करण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे व शिक्षण विस्तार अधिकारी प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रशिक्षणात जि.प. जळगाव येथील वरिष्ठ लेखा सहाय्यक पद्माकर वाणी यांनी एल.सी.डी. प्रोजेक्टरच्या माध्यमातून SNA SPARSH प्रणालीची प्रत्यक्ष ऑनलाइन प्रक्रिया व कार्यपद्धतीचे प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सहभागींच्या विविध शंकांचे निरसन केले.
गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांनी प्रास्ताविकातून SNA SPARSH प्रणाली आणि मुख्याध्यापकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. तंत्रस्नेही शिक्षक दत्तात्रय सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले, तर केंद्र समन्वयक किरण शिसोदे यांनी आभार मानले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी तालुका वरिष्ठ लेखा सहाय्यक विजय बारी, सर्व तंत्रस्नेही शिक्षक, साधन व्यक्ती, अपंग समावेशित तालुका समन्वयक व विशेष शिक्षक यांनी सहकार्य केले.