हिंदी अध्यापक मंडळाची सहविचार सभा संपन्न

विविध क्षेत्रांत नावलौकिक करणाऱ्या शिक्षकांचा हिंदी अध्यापक मंडळाकडून गौरव

अमळनेर : येथील हिंदी अध्यापक मंडळाची सहविचार सभा नुकतीच संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी हिंदी अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष आशिष शिंदे होते. माजी अध्यक्ष दिपक पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संघटनेचा लेखाजोखा मांडला.

विविध क्षेत्रांत नावलौकिक करणाऱ्या शिक्षकांचा हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने गौरव करण्यात आला. यात, मंडळाचे तालुकाध्यक्ष आशिष शिंदे (सेट परीक्षा उत्तीर्ण), जिल्हा कार्यकारणी सदस्य एन.आर.चौधरी (पेट परीक्षा उत्तीर्ण), सहसचिव भारती भांडारकर यांना पत्रकार संघाच्या वतीने नाशिक येथे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला, हिंदी मंडळाचे प्रसिध्दी प्रमुख ईश्वर महाजन यांना पत्रकारिता क्षेत्रात पार्लमेंट इंटरनँशनल पुरस्कारासाठी निवड झाली. या सर्वांचा गौरव हिंदी अध्यापक मंडळाचे माजी अध्यक्ष दिपक पवार, सचिव दिलीप पाटील, कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, डॉ. किरण निकम, सौ.रंजना वानखेडे, मनीष उघडे, सोपान भवरे, मुनाफ तडवी यांनी केला. याच बरोबर मंडळाच्या वतीने सानेगुरुजी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पतपेढीच्या महिला अध्यक्षा सुलोचना पवार यांचाही सत्कार करण्यात आला.

हिंदी अध्यापक मंडळाचे कार्य कौतुकास्पद असूून सर्व शिक्षक एकमेंकाच्या सुख दु:खात सहभागी होत असतात. सदस्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार झाल्याबद्दल आनंद वाटत असून मंडळाची उत्तरोत्तर प्रगती होवो असे सौ. रंजना वानखेडे यांनी सांगितले. आशिष शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणातून आगामी वर्षांत राबवावयाच्या उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा केली. सचिव दिलीप पाटील यांनी अनुमोदन दिले. राजेंद्र पाटील यांनी आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!