शेतकऱ्यांना मदत व पंचनाम्याबाबत अडचणी असल्यास शिवसेनेच्या मदत केंद्राशी संपर्क करावा

अमळनेर : शिवसेना ही कायम स्वरूपी शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शिवसेनेने उभारलेल्या ” शिव मदत केंद्राचा” दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ राजेंद्र पिंगळे यांनी केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने झालेल्या शिव मदत केंद्राच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
परतीच्या अवकाळी पावसाने तालुक्यात गेल्या पंधरवाड्यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. सरसकट पंचनामे होऊन शेतकऱ्यांना तात्काळ शासनाची मदत व्हावी. वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पिके आडवी झाल्याने हिरावला गेला असल्याने जनावरांना चाऱ्याचाही प्रश्न बिकट झाला आहे. पावसात घरांची पडझड, फळबागा व शेतीमाल यांचे नुकसान झाल्याने त्यांचेही पंचनामे तातडीने होऊन भरपाई मिळावी. झालेल्या नुकसानास हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळावी अशीही मागणी करण्यांत आलेली आहे. शेतकऱ्यांना मदत व पंचनाम्याबाबत काही अडचणी असल्यास शिवसेनेच्या दुष्काळग्रस्त मदत केंद्र सुभाष चौक येथे संपर्क करावा. तसेच पिकविमा, तलाठी, ग्रामसेवक यांनी केलेल्या पंचनाम्याविषयी तसेच शेतकऱ्यांनी काढलेल्या पिकविमा बँक खाते विषयी काही तक्रारी असल्यास शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ राजेंद्र पिंगळे (९४२१५१६२९४), तालुकाप्रमुख विजू मास्तर (९१५८०३९१२९), संजय कौतिक पाटील (९०२८३०५७३०), केंद्रप्रमुख नितिन निळे (९९२२२५३७००), वि. क्षेत्रप्रमुख किरण पवार (९९२३४७३७३७), कृ.उ.बाजार समिती संचालक महेश देशमुख (९४२०११११३३) यांचेशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त वंचित शेतकऱ्यांनी मदत केंद्रावर फॉर्म भरावे असे आवाहन अमळनेर शिवसेनेतर्फे करणेत आले आहे. मदत केंद्र उद्घाटन प्रसंगी शहरप्रमुख प्रताप शिंपी, देवेन्द्र देशमुख, जीवन पवार, मोहन भोई, डॉ.शशिकांत सोनार, रामचंद्र परब, संदीप बोरसे, विजय पाटील, श्रीकांत पाटील, मिलिंद निळे व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. शेतकरी बांधवात आसाराम धनगर निंभोरा, कांशीराम पाटील दोधवद, बापू पाटील, विठ्ठल पाटील, नथा नागो पाटील पैलाड, महादू शिंदे रंजाणे, विनोद देशमुख गांधली, अशोक शिंपी नगाव, सिताराम काटकर दोधवद, दिलीप पाटील अमळनेर, प्रकाश पाटील, वना पाटील, डिगंबर पाटील देवळी, नाना निळे अमळनेर आदी शेतकऱ्यांनी मदत केंद्रावर फॉर्म भरलेत.