ग्लोबल स्कूलचे कलाशिक्षक अशोक पाटील यांना “ग्लोबल अँचीवर्स अवार्ड”

अमळनेर : येथील एन.टी मुदडा ग्लोबल इंग्लिश स्कुलमधील कलाशिक्षक अशोक मधुकर पाटील यांना नुकताच जावेद खान व सोनल कौशल यांच्या शुभहस्ते “ग्लोबल अँचीवर्स अवार्ड” प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह, सन्मान पत्र, गोल्डमेडल असे पुरस्काराचे स्वरुप होते. भोपाळ येथील एक सखा सोशल वेल्फेअर सोसायटी आणि अँन्टी हरासमेन्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय स्तराचा हा पुरस्कार आहे. सामाजीक, राजकीय व कलाक्षेत्रात प्रभावी काम केलेल्या देश-विदेशातील व्यक्तींना “ग्लोबल अँचीवर्स अवार्ड” प्रदान करण्यात येतो.
तारीख १० नोव्हेंबर रोजी एका रंगारंग कार्यक्रमात फॉर्च्युन ह्या पंचतारांकीत हाॅटेलात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. भारतातील अनेक राजकीय, सामाजीक, कला व अभिनय क्षेत्रातील मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित होती. कलाशिक्षक अशोक पाटील यांंचे ग्लोबल स्कुलचे चेअरमन प्रकाश मुंदडा, सौ.छाया मुंदडा, प्राचार्य लक्ष्मण प्रजापती, सौ.विद्या मॅडम, शिक्षक व शिक्षकेत्तर कमर्चारी यांनी अभिनंदन केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!