
अमळनेर : येथील नगरपरिषदेच्या पूज्य सानेगुरुजी कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत भारतीय कर्मचारी महासंघाचे जनरल सेक्रेटरी (इंटक) सोमचंद संदानशिव यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दल ज्येष्ठ कामगारनेते रामभाऊ संदानशिव, प्रा.डॉ.विजय तुंटे, संजय चौधरी, शिवाजी महाराज गार्डन ग्रुपचे प्रयांक पटेल, प्रविण पारख, अँड ब्रम्हे, प्रा.अशोक पवार, संदीप घोरपडे, पत्रकार किरण पाटील, चेतन राजपूत, गोपीचंद चव्हाण, ज्ञानेश्वर संदानशिव, चंद्रकांत शिंगाणे, कर्मचारी व हितचिंतकानी अभिनंदन केले आहे. बिनविरोध निवडीसाठी चंद्रकांत संदानशिव, शेखर देशमुख, प्रसाद पाटील, ईश्वर पाटील, इक्बाल पठाण, भाऊसाहेब पाटील, सलीम शाह यांनी सहकार्य केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री सुनील महाजन यांनी कामकाज पाहिले. सचिव प्रदीप कुलकर्णी यांनी त्यांना सहकार्य केले.