आटाळे येथील ग्रामसेवकास शिवीगाळ आणि मारहाण; पोलीसांत गुन्हा दाखल

अमळनेर : तालुक्यातील आटाळे गावात घरकुलाच्या कामावरून ग्रामसेवक नितीन पाटील यांना एकाने शिवीगाळ आणि गच्ची धरून मारहाण केल्याची घटना शनिवारी (ता.१६) रोजी घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली आहे.

दिलेल्या फिर्यादीत पाटील यांनी म्हटले आहे की, ते शिरसाळे येथे ग्रामसेवक असून त्यांच्याकडे आटाळे गावाचा प्रभारी अतिरिक्त कारभार दिला आहे. त्यामुळे ता.१६ रोजी ते सकाळी आटाळे गावात गेल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात उदय चौधरी यांचा विवाह नोंदणी दाखल्याचे काम करीत होते. याच वेळी गावातील भगवान बाविस्कर याने तेथे येऊन माझ्या घरकुलाचे काम कधी होणार ? अशी विचारणा केली. यावर ग्रामसेवक यांनी तुम्हाला घरकुल आधीच मिळाले आहे, असे सांगितल्याने त्याचा राग येऊन त्याने गच्ची धरून शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच टेबलावर असलेले ग्रामपंचायतीचे दफ्तर फाडून खुर्च्यांची तोडतोड केली. कार्यालयाबाहेर येऊन मोठा दगड उचलून मारण्याची व अँट्रासिटी दाखल करण्याची धमकी दिली. या वेळी कार्यालयात गावातील काही मंडळी व शिपाई उपस्थित होते. त्यांच्या समक्ष ही घटना घडली. याप्रकरणी संशयित आरोपी भगवान बाविस्कर यास अटक करून त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३३२, २९४, ३२३, ५०४, ५०६, ४२७ व ४६२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. कॉ. सुभाष महाजन हे करीत आहेेत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!