
अमळनेर : तालुक्यातील जळोद येथे ता.१७ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तेथील कोतवाल प्रवीण साहेबराव शिरसाठ यांनी तलाठी रवींद्र पाटील यांना फोनवरून सांगितले. त्यानंतर कारवाई केली असता, तेथे एक वाळूने भरलेला ट्रक एम.एच.०६ एसी ४९०, विना क्रमांकाचे जेसीबी यंत्र आढळून आले. अमळगांव येेेथील अमोल रमेश पाटील यांच्या मालकीचे हे जेसीबी असल्याचे कळते.
मात्र त्यावेळी कारवाई करत असताना चालकाने अमोल पाटील यांच्या सांगण्यावरून जेसीबी यंत्र पळवून नेले. ट्रकचा पंचनामा करून तो तहसील कार्यालयात जमा करायला सांगितला असता, ट्रक नादुरुस्त असल्याचे अमोलने सांगितले. तलाठी रवींद्र पाटील हे अमोल ला नोटीस द्यायला आले असता, त्याने तेथून ७७३० रुपयाची वाळूूूू भरलेला ट्रक पळवून नेला. याप्रकरणी तलाठी पाटील यांच्या फिर्यादीवरून अमोल पाटील विरुद्ध चोरी, सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभाकर पाटील करीत आहेत.