जुगार खेळणाऱ्यांवर पोलीस पथकाची कारवाई; जुगारींना अटक

अमळनेर : शहरातील पैलाड व गांधलीपुरा भागात पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकून पत्त्याचा जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली. पोलीसांना पाहून तेथील अनेकांनी पळ काढला. या दरम्यान पोलीसांनी आठ जुगारींना अटक केली असून त्यांच्याकडून ६० हजाराचा माल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी दिपक माळी, शरद पाटील, राजेश चव्हाण, भूषण बाविस्कर, विनोद धनगर, नाना चित्ते, दिलीप जाधव या पोलीसांच्या पथकासह बोरी नदी काठावरील ईदगाह जवळील विटभट्टीजवळ तसेच पारोळा रस्त्यावर हॉटेल रवीच्या मागे जुगार अड्ड्यावर धाडी टाकल्या. यामुळे जुगाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. या कारवाईत अनिल पाटील, अरुण चंदनशिव, समाधान भोई, गुलाब मोरे, अक्षय गोयल, नासिर शेख मेहमूद, सुरेश जेधे, राहुल गोयल यांना झंन्ना मन्ना जुगार खेळताना अटक करून त्यांच्याजवळील चार भ्रमणध्वनी, ३४ हजार रुपयांची रोख रक्कम, पत्याचे कॅट असा एकूण ६० हजार रुपयांचा माल जप्त केलाा. सर्व आरोपींना मुंबई जुगार कायद्यान्वये अटक करण्यात आली असून तपास हेड कॉन्स्टेबल दिपक विसावे करीत आहेत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!