बस स्थानकावर पोलीस हवालदार निंबा शिंदेंचा प्रामाणिकपणा

अमळनेर : येथील बस स्थानकावर दिवसा प्रवाशांसह विद्यार्थ्यांची नेहमीच गर्दी असते. गर्दीचा फायदा घेत अधून मधून चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. अशातच, पोलीस हवालदार निंबा शिंदे यांनी एका महीलेची हरवलेली पर्स परत केल्याने त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, मालेगाव येथील नजमाबी नसीर खान अमळनेर बस स्थानकात होत्या. दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास बस स्थानकावर हवालदार निंबा शिंदे त्यांचेसोबत असलेले होमगार्ड भूषण शिंदे यांना लेडीज पर्स सापडली. त्यांनी उपस्थित प्रवाशांना पर्सविषयी विचारपुस केली. विचारपुस करत असतांना समोरून एक मुस्लिम महिला आली व पोलीस हवालदार निंबा शिंदे यांना पर्स हरवली असल्याची माहिती दिली. यावर हवालदार शिंदेंनी त्यांना पर्सचा रंग कोणता ? पर्समध्ये काय वस्तू होत्या ? याबाबत शहानिशा केली. यावर सदर महिलेने गुलाबी रंगाची पर्स असून त्यात दागदागिने असल्याचे सांगितले. पर्स शोधून त्यात दीड ते दोन लाख रुपये किंमतीचे दागदागिने सापडले. सदर महिलेची खात्री पटल्यानंतर हवालदार शिंदे यांनी सदर महिलेला दागिन्यांसह पर्स परत केली. हवालदार शिंदे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!