माळण परिसर रणाईचे फार्मर प्रोड्युसर कंपनी कार्यालयाचे उद्घाटन

अमळनेर : तालुक्यातील रणाईचे येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली असून नुकतेच (ता.१४) रोजी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

राष्ट्रविकास अ‍ॅग्रो एज्यूकेशन संस्था आणि नाबार्डच्या संयुक्त विद्यमाने माळण परिसर रणाईचे फार्मर प्रोड्युसर कंपनीचे रजिस्ट्रेशन झाले असून कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन व प्रमाणपत्राचे वितरण नाबार्डचे महाप्रबंधक श्रीकांत झांबरे व भाजपा नेते उदय वाघ यांच्या उपस्थितीत पार पडले. महाराष्ट्र राज्यातील पाणलोट विकास प्रकल्पांतर्गत, शाश्वत विकास योजना या कार्यक्रमांतर्गत या कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीमुळे काय फायदे होतील ? हे भटू पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले. तसेच माळण परिसरातील शेतकऱ्यांनी या कंपनीचे प्रमोटर बनण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!