सर्वांच्या सहकार्यानेच मिळाला पुरस्कार व होता आले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार : संदीप वायाळ

अमळनेर : केंद्र व राज्य शासनाच्या घरकुल योजनेत प्रथम टप्प्यात ८७.०७ टक्के उद्दिष्टपुर्ती पुर्ण करण्यात अव्वल स्थानी असल्याबद्दल अमळनेर पंचायत समितीला नाशिक विभागात महाराष्ट्र शासनाचा आवास योजना पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व राज्याचे मुख्य सचिव मेहता यांच्या हस्ते पुरस्कार देेेवून गौरविण्यात आले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी पुरस्कार स्वीकारला. ग्रामविकास विभाग, ग्रामीण गृहनिर्माण राज्य व्यवस्थापन कक्ष अंतर्गत ता.२० नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
एका वर्षात ४६ व्या क्रमांकावरून अव्वल स्थानी (प्रथम) येण्यासाठी सर्वांचेच सहकार्य मिळाले. घरकुलांचे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी आपल्याला आधीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर व आताचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन.पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.संजय म्हस्कर यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सुनील गायकवाड पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. पंचायत समितीतील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी, सर्व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी प्रचंड मेहनत घेत सहकार्य केेले. तालुक्यातील सरपंचानीही घरकुलं कामात रस घेऊन घरकुले झपाट्याने पूर्ण केली. घरकुलं कामात पूर्ण स्वातंत्र्य देऊन अजय नष्टे साहेबांनी आपल्यावर विश्वास ठेवला. सर्वांच्या सहकार्यानेच हा पुरस्कार मिळाला व या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होता आले असे श्री वायाळ म्हणाले.