विभागीय खान्देशी बोली मराठी साहित्य संमेलनाची आढावा बैठक संपन्न

अमळनेर : येथील पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय आयोजित महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई पुरस्कृत विभागीय खान्देशी बोली मराठी साहित्य संमेलन २०१९ तारीख २३ व २४ नोव्हेंबर रोजी पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच ग्रंथालयात आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीत कार्यक्रम यशस्वितेसाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी भव्य व आकर्षक लोकसंस्कृती व साहित्यिक परंपरेचे देखावे आणि आकर्षक चित्ररथाने सज्ज अश्या ग्रंथ दिंडीने सुरुवात होणाऱ्या खान्देशी बोलीभाषा संमेलनाच्या यशस्वितेसाठी अमळनेरच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ग्रंथालयाचे सचिव प्रकाश वाघ यांनी नियोजन समित्यांची माहिती देत पूर्व तयारीबाबत आढावा घेतला. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य रमेश पवार यांनीही अमळनेरच्या साहित्य परंपरेला साजेसे कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन केले. उपाध्यक्षा माधुरी भांडारकर, संदिप घोरपडे, रणजित शिंदे यांनी साहित्य संमेलनाचे नियोजनात नवोदित साहित्यिक व युवकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. पत्रकार उमेश काटे, ईश्वर महाजन व विजयसिंग पवार, विजया गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले. साहित्य संमेलनाच्या यशस्वितेसाठी संमेलन कार्यवाह समिती अंतर्गत विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यात, ग्रंथदिंडी समिती, नाट्यगृह व रंगमंच सजावट समिती, प्रचार व प्रसार समिती, निवास व भोजन समिती, व्यवस्थापन समिती, स्वागत समिती अश्या विविध समित्यांचे गठन करून जाहीर करण्यात आल्या.

या बैठकीवेळी नगीनचंद लोढा, डॉ.शैलजा माहेश्वरी, ॲड.तिलोत्तमा पाटील, अनिल घासकडवी, अरुण सोनटक्के, भीमराव महाजन, नरेंद्र पाटील, विकास ब्राह्मणकर, कमलाकर संदानशिव, गोकुळ बागुल, शैलेश काळकर, ॲड.रामकृष्ण उपासनी, निलेश पाटील, दिपक वाल्हे, संचालक चंद्रकांत नगावकर, पी.एन.भादलीकर, यांचेसह भारती कोठावदे, ज्योतीर्मयी सोनवणे, रुपाली पवार आदी उपस्थित होते. सुमित धाडकर यांनी आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!