
अमळनेर : जेष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी परिवर्तन जळगाव निर्मित ‘अमृता, साहिर, इमरोज’ या प्रेमनाट्यातून कवयित्री अमृता प्रितम यांच्या जीवनाला रंगमंचावर कलात्मक स्वरूपात अत्यंत प्रभावीपणे सादरीकरण केले. दिग्दर्शिका मंजुषा भिडे, कलाकार जयश्री पाटील, हर्षदा कोल्हटकर, राहुल निंबाळकर, लेखक शंभू पाटील होतेे. यावेेळी ” गांधी नाकारायचा -पण कसा ?” हे अभिवाचन सादर करून उपस्थित रसिक श्रोत्यांना खिळवून ठेवले होते. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय आयोजित महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई पुरस्कृत विभागीय खान्देशी बोली मराठी साहित्य संमेलनात झालेल्या कार्यक्रमात मोठी गर्दी होती. हृदयाला भेदणारी अशी अमृता प्रीतम यांची कहाणी सगळ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचली. कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण करून श्रोत्यांची मने जिंकली.त्यानंतर कविसंमेलनही रंगले.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, चिटणीस प्रकाश वाघ, उपाध्यक्षा माधुरी भांडारकर, सहचिटणीस सुमित धाडकर, विश्वस्त बापू नगावकर, सदस्य ॲड. रामकृष्ण उपासणी, पी.एन भादलीकर, भीमराव जाधव, निलेश पाटील, ईश्वर महाजन, दिपक वाल्हे, प्रसाद जोशी, रणजित शिंदे, संदीप घोरपडे, प्रा. लिलाधर पाटील, विजयसिंह पवार, उमेश काटे, अनिल घासकडवी, नगिनचंद लोढा, विजया गायकवाड, ज्योतिर्मयी सोनवणे, नरेंद्र निकुंभ, गोकुळ बागुल, ललिता माळी, निरंजन पेंढारे, शैलेश काळकर, सोनाली पवार, सुनील बडगुजर, विकास ब्राह्मणकर, ॲड. तिलोत्तमा पाटील, भैय्यासाहेब मगर, प्रभाकर जोशी, हेमंत भांडारकर, विजयसिंह पाटील, दिनेश नाईक, संजय चौधरी, सतिष कांगणे, कांचन शहा, अपेक्षा पवार, सोमनाथ ब्राम्हे, रुपाली पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा पी.टी. धर्माधिकारी यांनी तर आभार प्रदर्शन दिलीप सोनवणे यांनी केले