अमळनेर : ‘इंग्रजी भाषा शिकणे व आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. ती परराष्ट्रीय भाषा असली तरी ही भाषा शिकणे, आत्मसात करणे म्हणजे इतर भाषांचा अवमान करणे नव्हे’. यासाठी आर्मी स्कुलमध्ये सुरू असलेले इंग्रजी दृढ होण्यासाठी सुरू असलेले विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगी ठरणार आहे असे मत विजयनाना पाटील आर्मी स्कूल व ज्यू.कॉलेजचे प्राचार्य एस.यु.पाटील यांनी व्यक्त केले. ‘इंग्लिश डे’ निमित्त आयोजित बक्षिस वितरण प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विभाग उपप्रमुख शरद पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख उमेश काटे, इंग्रजी विभाग प्रमुख संतोष पवार, इंग्रजी शिक्षक अनिल पाटील, सुनिल नगराळे, संदीप बनछोडे, रुपाली पाटील हे उपस्थित होते. शरद पाटील म्हणाले की, ‘इंग्रजी भाषा शिकायची असेल तर ती जास्तीत जास्त श्रवण करा, शब्दभरणा वाढवा आणि छोटी छोटी वाक्य तयार करून बोलण्याचा प्रयत्न करा.
तत्पूर्वी सकाळ सत्रात ‘इंग्लिश डे’ चे उद्घाटन प्राचार्य एस.यु.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी सुभेदार मेजर नागराज पाटील होते. डी. झेड. महाजन, एस.ए. बाविस्कर, ए टी पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. नागराज पाटील म्हणाले की, अशा उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी बौद्धिक दृष्टया प्रबळ होतो. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होऊन उज्वल भविष्य निर्माण होण्यास मदत होते. उमेश काटे म्हणाले की, इंग्रजी बोलताना कोणी आपल्याला हसेल याकडे दुर्लक्ष करून आत्मविश्वासाने बोला. इंग्रजीतून विचार करण्याचे आवाहन केले. इंग्रजी भाषा अवगत करण्यासाठी त्यांनी सात महत्वपूर्ण पायऱ्याही सांगितल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन केलं. त्यात ड्रामा, डान्स, पोएम सिंगिंग, स्टोरी टेलिंग, फॅन्सी ड्रेस इ. कार्यक्रम होते. एस.ए.वाघ, प्राजक्ता शिंदे यांनी परीक्षण केले. चेतन पाटील व सचिन पवार यांनी सूत्रसंचालन केले तर स्वामी जंभोरे याने आभार मानले. एस.एन.महाले, व्ही.डी.पाटील, डी.एच.पाटील, ए.ए.वानखेडे, जी.पी.हडपे, संदीप ढोले, टी.के.पावरा, शिवाजी पाटील, एस.ए.पाटील, किरण पगार यांच्यासह सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.
इंग्रजी विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी यासाठी साजरा करण्यात आलेल्या “इंग्लिश डे” च्या कार्यक्रमात सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी झालेल्या विविध स्पर्धांमध्ये बक्षीसपात्र विद्यार्थ्यांत गीत गायन स्पर्धा प्रथम- यश महाजन, द्वितीय आर्यन पवार, तृतीय- अनिकेत सपकाळे. कथाकथन स्पर्धा प्रथम- सावंत चव्हाण, द्वितीय- दुर्गेश जाधव, तृतीय- निखिल पाटील. फॅन्सी ड्रेस (लहान गट) प्रथम- युवराज अहिरे, द्वितीय- हर्षवर्धन बिऱ्हाडे, तृतीय- नरेंद्र अहिरे. फॅन्सी ड्रेस (मोठा गट) प्रथम- प्रसाद पाटील. समूह नृत्य स्पर्धा प्रथम- वैभव सोनवणे ग्रुप, द्वितीय- कुवर ग्रुप, तृतीय- अभिजीत पाटील ग्रुप. नाटक स्पर्धा प्रथम- मयुर पाटील ग्रुप, द्वितीय- राठोड ग्रुप, तृतीय- ईश्वर पाटील ग्रुप. काव्यवाचन स्पर्धा प्रथम- पाचवी ब , द्वितीय- सातवी अ, तृतीय- सहावी अ. संभाषण स्पर्धा प्रथम- आठवी अ, द्वितीय- मयूर पाटील ग्रुप, स्वपरिचय स्पर्धा प्रथम- दक्ष पाटील. शैक्षणिक साहित्य स्पर्धा प्रथम- गणेश गांगुर्डे, द्वितीय- वैभव सोनवणे, तृतीय- सावन चौहान. भित्ती फलक स्पर्धा प्रथम- सुरेश तडवी, द्वितीय- जयेश न्याहळदे, तृतीय- चेतन बोरसे यांचा समावेेेेश आहे.