अमळनेर : तालुक्यातील ग्राहकांसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे रविवार, ता.१ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता जी.एस.हायस्कूल, अमळनेर च्या आय.एम.ए. हॉल येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. धरणगाव महावितरणचे कार्यकारी अभियंता रमेश पवार यांची कार्यक्रमास उपस्थिती राहणार असून ते वीज ग्राहकांना मार्गदर्शन करणार आहेत. मकसूदभाई बोहरी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा होणार आहे.
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष मकसूदभाई बोहरी, तालुका संघटक राजेंद्र सुतार, तालुका सहसंघटक बापू चौधरी, सचिव विजय शुक्ल, सहसचिव योगेश पाने, महिला आघाडी प्रमुख अँड. भारती अग्रवाल व सदस्य यांनी केले आहे.