छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे ता. ८ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन
अमळनेर : भारतीय जनता पक्षाचे नेते उदय भिकनराव वाघ यांचे पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी डांगर बु।. येथे (ता.२९) साश्रु नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूसमयी ते ५२ वर्षांचे होते. त्यांना मुलगी भैरवी, ईशा आणि पुतण्या तिलक यांनी मुखाग्नी दिला. फुलांनी सजविलेल्या वाहनावर त्यांचा पार्थिव देह ठेवण्यात आला होता. त्यांचे राहत्या घरुन अंत्ययात्रा निघाली. अंतिम दर्शनासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक, प्रशासन क्षेत्रासह डांगर येथील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. अखेरचा निरोप देताना कुटुंबियांसह कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले होते.

भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे, माजी जलसंपदा तथा पालक मंत्री गिरीश महाजन, रावेरच्या खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, माजी आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाबराव देवकर, माजी आमदार शरद पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार बी.एस.पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, पं.स. सभापती वजाबाई भिल, आमदार देवयानी फरांदे, आमदार सिमा अहिरे, डॉ जितेंद्र ठाकूर धुळे, प्रा. सुनिल नेवे, कार्यकारी अभियंता राजपूत साहेब, ग.स.अध्यक्ष मनोज पाटील, वाल्मिक मामा, पी.सी.आबा, बाजार समिती सभापती प्रफुल्ल पवार, रामभाऊ संदानशिव, विनोद भैया पाटील, गोकुळ आबा बोरसे, जिल्हाध्यक्ष संजय पाटील, धुळे उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार मिलिंद वाघ, शेखा हाजी मिस्तरी, मनोज बापू पाटील, विक्रांत पाटील, महेंद्र बोरसे, जयवंतराव आबा पाटील, श्याम अहिरे, निशांत अग्रवाल, बिजूनाना लांबोळे, धनगर दला पाटील, निलेश भांडारकर, सुभाष आण्णा चौधरी, अमळनेर कृषी व महावितरण विभागातील अधिकारी ग्रामस्थ यांचेसह असंख्य जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी उपस्थित नेत्यांनी उदय वाघ यांच्या आठवणींना उजाळा दिला. आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दूरध्वनी द्वारे शोकसंदेश दिला. ता. ८ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

