ओबीसी शिक्षक असोसिएशनचे गुरुगौरव पुरस्कार जाहीर

अमळनेर : ओबीसी शिक्षक विद्यार्थी पालक असोसिएशन या संघटनेच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. शैक्षणिक क्षेत्रात काम करतांना नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांचा संघटनेतर्फे गुणगौरव केला जातो. गेल्या दहा वर्षांपासून असोसिएशनचे अध्यक्ष विलासराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे. शैक्षणिक काम करीत असताना शिक्षकाच्या कामाची दखल घेतली जावी व पाठीवर कौतुकाची थाप असावी या उद्देशाने भव्य कार्यक्रमात शिक्षकांना सपत्निक सन्मानित केले जाते. ओबीसी शिक्षक असोसिएशनची नुकतीच धुळे येथे सहविचार सभा संपन्न झाली. त्यात जळगाव जिल्ह्यातून २५ प्रस्ताव आले होते यातून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान असलेल्या जळगाव जिल्ह्यातील निवडक बारा शिक्षकांची यादी गुरुगौरव पुरस्कार २०१९ साठी घोषित करण्यात आली. यावेळी ओबीसी शिक्षक असोसिएशनचे सचिव ईश्वर महाजन, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, व्ही. आर. महाजन, सतीश वैष्णव, ज्ञानेश्वर खलाणे उपस्थित होते.

पुरस्कारार्थी शिक्षकांमध्ये १) श्रीमती मनिषा गोविंद चौधरी, जि प. प्राथ. शाळा, शिरसाळे, ता. अमळनेर २) सतिश हरी कांगणे, यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा,पिंपळे बुद्रुक, ता. अमळनेर ३) जयश्री साळुंके, महिला महाविद्यालय, अमळनेर ४) गुणवंतराव शिवदास पाटील, जि.प.प्राथ. शाळा, धाबे, ता. पारोळा ५) विजयानंद देवानंद शिंदे, चिंधाबाई निंबाजी पाटील माध्यमिक विद्यालय, माचले, ता. चोपडा ६) मालोजी जयवंतराव पवार, जि. प. उच्च प्राथमिक शाळा, भातखंडे, ता. भडगांव ७) वैशाली प्रकाश पाटील, लाडकूबाई विद्यामंदिर व दादासाहेब सुपडू मालजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय, भडगांव ८) सुशांत प्रभाकर जगताप, क. दै. पाटील स. मा. वि. गुढे, ता. भडगांव ९) उमेश हरी इंगळे, ब. गो. शानबाग विद्यालय, सावरखेडा १०) गोपाळ रामकृष्ण महाजन, सार्वजनिक विद्यालय, आसोदा ११) रमाकांत सुधाकर ठाकूर, शिवाजी उच्च माध्य. व्यावसायिक विद्यालय, हातेड, ता. चोपडा १२) रविंद्र राजाराम वानखेडे, सौ. साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, आमडदे, ता. भडगांव या शिक्षकांचा समावेश आहे. निवड झालेल्या शिक्षकांना डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका कार्यक्रमात सपत्नीक स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे असे अध्यक्ष विलासराव पाटील व सचिव ईश्वर महाजन यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!